<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<mods xmlns:xsi="http://www.w3.org/2001/XMLSchema-instance" xmlns="http://www.loc.gov/mods/v3" version="3.1" xsi:schemaLocation="http://www.loc.gov/mods/v3 http://www.loc.gov/standards/mods/v3/mods-3-1.xsd">
  <titleInfo>
    <title>पणतीला जपताना</title>
    <subTitle>प्रेम, धर्मांतर आणि बरेच काही</subTitle>
  </titleInfo>
  <name type="personal">
    <namePart>Darekar S.</namePart>
    <role>
      <roleTerm authority="marcrelator" type="text">creator</roleTerm>
    </role>
  </name>
  <typeOfResource>text</typeOfResource>
  <originInfo>
    <place>
      <placeTerm type="text">Pune</placeTerm>
    </place>
    <publisher>Abhinav Prkashan</publisher>
    <dateIssued>2021</dateIssued>
    <issuance>monographic</issuance>
  </originInfo>
  <language>
    <languageTerm authority="iso639-2b" type="code">eng</languageTerm>
  </language>
  <physicalDescription>
    <form authority="marcform">print</form>
    <form authority="gmd">Marathi</form>
    <extent>327pp</extent>
  </physicalDescription>
  <abstract>अनेकांना या ‘लव्ह जिहाद’ प्रश्नाचे अद्याप गांभीर्यच समजलेले नाही, ही सर्वात मोठी खेदाची गोष्ट आहे. अनेक जण हा प्रश्न काही विशिष्ट हिंदुत्ववादी संस्था-संघटनांनी बाऊ केलेला विषय असे मानून दुर्लक्ष करतात, ही आणखी क्लेशकारक गोष्ट आहे. या अशा पार्श्वभूमीवर ‘लव्ह जिहाद’चा विषय सांगोपांग, सविस्तर आणि सबळ पुराव्याच्या आधारे सजून घेण्यास समीर दरेकर यांचे ‘पणतीला जपताना...’ हे  पुस्तक झणझणीत नेत्रांजनासारखे आहे.
 
 
 
भारत हा प्राचीन काळापासून मूलतःच शांतिप्रिय व सहिष्णु देश आहे. हिंदू समाज हा या देशाचा अधिष्ठानरूप समाज असून या समाजाने आपल्या स्वभावानुरूप अनेक अल्पसंख्य विदेशी समाजांना त्यांच्या पंथ व उपासना पद्धतीसह स्थान व मान दिला आहे. पण, ‘जिहाद’ नावाखाली पूर्वी तलवारीच्या जोरावर धर्मप्रसार करणार्‍या धर्मांध मुस्लिमांनी आता ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदू मुलींचे इस्लाम धर्मांतरण करण्याचे षड्यंत्र रचले आहे. प्रेम, प्रेमविवाह हा व्यक्तिगत विषय आहे. पण, ‘लव्ह जिहाद’ भारताच्या सामाजिक स्वास्थ्याला सुरूंग लावणारा राष्ट्रीय प्रश्न आहे. हे साधार पुराव्यानुसार सिद्ध करून समाजाला जागृत करणारे नेत्रांजन म्हणजे समीर दरेकरांचे पुस्तक - ‘पणतीला जपताना...’ भारत देश हा अनेक प्रकारच्या विविधतेने नटलेला, संपन्न त्याचबरोबर प्राचीन देश आहे. अनेक भाषा, प्रांत, समाज, पंथ-संप्रदाय, चालीरिती, खाद्य, वेशभूषा अशी बहुविविधता हेच भारताचे पूर्वापार वैशिष्ट्य आहे. उदारता, सर्वसमावेशी सहिष्णुता ही भारतीय समाजाची जगभर ओळख आहे. पारशी, यहुदी अशा जगभर अपमानित झालेल्या अल्पसंख्य समाजाला सन्मानाने स्थान देणारा एकमेव देश म्हणून भारत विश्वप्रसिद्ध आहे. भारताचा हा पूर्वापार गौरव हा एका राष्ट्राचा गौरव आहे, तद्वत येथील अधिष्ठानरूप सकल हिंदू समाजाचा गौरव आहे. ‘एकम् सत विप्रा बहुधा वदन्ति’ या भारतीय-हिंदू चिंतनाचा, तत्त्वविचारांचा तो गौरव आहे. पण, अलीकडे सर्वधर्मसमभावाचे चुकीचे अर्थ करीत दांभिक राजकारण्यांनी व पक्षांनी आपल्या स्वार्थासाठी- सत्तेसाठी मुस्लीम तुष्टीकरणाच्या लांगूलचालन धोरणाने नव्या सामाजिक-राष्ट्रीय स्वरूपाच्या अनेक आत्मघाती संकटाला जन्म दिला आहे. त्या अनेक संकटांपैकी सध्या सर्वत्र चर्चिला जाणारा सामाजिक (राष्ट्रीय) प्रश्न म्हणजे लव्ह जिहाद!
</abstract>
  <recordInfo>
    <recordCreationDate encoding="marc">260109</recordCreationDate>
    <recordChangeDate encoding="iso8601">20260109125253.0</recordChangeDate>
  </recordInfo>
</mods>
